ठाणे - (विनोद वास्कर ) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारावी गुरुतत्त्व वाहिनीचे काटई नाका ते शिळ फाटा टाकी येथे तातडीचे दुरस्तीचे काम हाती घेतल्यामुळे गुरूवारी दि. २३ मे २०२४ रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते शुक्रवारी दि. २४ मे २०२४ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत एकूण २४ तासासाठी काटई ते ठाणे दरम्यान पाणीपुरवठा बंद राहील.
शट डाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, मीरा-भाईंदर महानगरपालिका, टी. टी. सी. औद्योगिक क्षेत्र, वागळे ईस्ट औद्योगिक, या सर्व ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील काही तास कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. तरी सर्व नागरिकांनी पाणीसाठा करून ठेवा जेणेकरून २४ तास तुम्हाला पाणी पुरेल, तसेच सर्वांनी याची नोंद घ्यावी, सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून करण्यात आले आहे.