उरण दि ९ ( विठ्ठल ममताबादे ) : उंची रोधकामुळे उरण-पनवेल या मुख्य मार्गावरील एसटीची प्रवासी बससेवा मागील तीन वर्षांपासून बंद आहे.या उंची रोधका मुळे प्रवाशांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. आता मात्र ही समस्या आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनासाठी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी केलेल्या प्रयत्ना मुळे सुटली आहे.हे उंची रोधक सोमवारी रात्री अखेर हटविण्यात आले आहेत. त्यामुळे बोकडवीरा, फुंडे, डोंगरी आणि पाणजे येथील हजारो नागरिकांना दिलासा मिळाला आहे. याबद्दल आनंदही व्यक्त केला जात आहे. मात्र हे उंचीरोधक हटविण्यात आल्याने मार्गावरील एसटी बससेवा पूर्ववत करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
नवी मुंबई वाहतूक विभागाने उरण-पनवेल मार्गावरील नादुरुस्त खाडीपुलाच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले उंचीरोधक हटविण्याची मागणी पत्रव्यवहारा द्वारे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी प्रशासनाकडे केली होती. अखेरीस रात्रीच्या वेळी वाहतूक विभाग आणि सिडकोच्या माध्यमातून हे उंचीरोधक हटविण्यात आले आहेत. उंचीरोधकामुळे मागील तीन वर्षांपासून या मार्गावरील प्रवासी वाहतुकीचे एकमेव साधन असलेली एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे. सिडकोने उरण- पनवेल मार्गावर बसविण्यात आलेले बोकडवीरा आणि फुंडे हायस्कूलनजीकचे उंची रोधक हटविण्यात आले आहेत. विद्यमान आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी उंची रोधक हटवण्याची मागणी केली होती.सतत पाठपुरावा केला होता.त्याला आता यश आले आहे.आता प्रवाशी वर्गाचे प्रवास सुलभ, सुरक्षित होणार असल्यामुळे प्रवाशी वर्गांनी आमदार महेश बालदी, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांचे आभार मानले आहेत.