लडाख : लडाखमध्ये दौलतबेग ओल्डी भागात नदी ओलांडण्याचा सराव करत असताना एका कनिष्ठ अधिकाऱ्यासह लष्कराचे ५ जवान शहीद झाले.
नदीच्या पाण्यातून रणगाडा पुढे नेण्याचा सराव करत असताना नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्यानं हे जवान त्यामध्ये वाहून गेले. या पाचही जवानांचे मृतदेह सापडले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
या जवानांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी असून, या दु:खद प्रसंगी संपूर्ण देश त्यांच्या पाठिशी आहे, असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे.