कलयाण / ठाणे ( आशा रणखांबे ) : आंतरराष्ट्रीय स्थळ बुद्ध भूमी फौंडेशन, अशोकनगर, वालधुनी, कल्याण येथे त्यागमूर्ती माता रमाई (आंबेडकर) यांचे भव्य स्मारक उभारण्याचं काम बुद्ध भूमी फौंडेशनचे संस्थापकीय अध्यक्ष भदंत गौतमरत्न महाथेरो ह्यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध विहार संघटना समन्वय समिती ठाणे यांच्या माध्यमातून संपन्न होत आहे. या स्मारकाचा लोकार्पण सोहळा दि. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी माता रमाईंच्या जयंतीदिनी करण्याचे ठरवले असून स्मारक निर्माण कार्यासाठी ४५ ते ५० लाखाचा निधी अपेक्षित आहे.
माता रमाई आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी धम्मदान देण्याचे आव्हान बौद्ध विहार संघटना समन्वय समितीने केले आहे. समाजातील दानशुर रमाईच्या लेकरांना जमेल तसे दान करावे धम्मदान आणि स्मारकाबाबदल अधिक माहितीसाठी आपण इं. गौतम बस्ते 830827107 , नवीन गायकवाड 9223451420 , रोहिणीताई जाधव 9987470967 यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान करण्यात येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात माता रमाईचे अनन्य साधारण महत्त्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रमाबाईंवर निस्सीम प्रेम होते, त्यांनी आपला ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा ग्रंथ आपल्या ‘प्रिय रामू’ला अर्पण केला. अर्पणपत्रिकेत बाबासाहेबांनी लिहिले आहे की, ‘‘तिच्या हृदयाचा चांगूलपणा, मनाची कुलीनता आणि शीलाच्या पावित्र्यासह तिचे शालीन मनोधैर्यनी माझ्याबरोबर दुःख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसांत तिने मला दाखविली- जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रविरहित काळ चिंतेसह कंठीत होतो".
अशा त्यागमूर्ती माता रमाईचे बुद्ध भूमी येथे बनणारे स्मारक येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायक असणार आहे. रमाईच्या असीम त्यागाला महाराष्ट्रातील रमाईंची लेकरं आपल्या आईला ह्या स्मारकाच्या माध्यमातून अभिवादन करणार आहेत.