( सिक्रेट हार्ट स्कूल ) मानले खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेऊन मानले आभार
डोंबिवली ( शंकर जाधव ) : शेतकऱ्याच्या पिकाला योग्य हभी भाव मिळवून देण्यासाठी संसदेत आवाज उठवून छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्रात शेतकऱ्यासाठी पुन्हा एकदा सुराज्य आणावे यासाठी खासदार अमोल कोल्हे यांची कल्याण मधील सिक्रेट हार्ट स्कूल मधील चिमुकली अन्नदाभेट घेऊन मागणी केली.
गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्याच्या पिकाला हभी भाव मिळण्या संदर्भात देश भरातील शेतकऱ्याच्या आंदोलनाने शेतकऱ्याच्या जीवन मरणाचा गंभीर प्रश्न चिमुकल्या शाळकरी मुलांनाही सताऊ लागला आहे. शेतकऱ्याच्या शेत पिकाला हमी भाव मिळत नसल्याने कर्जबाजारी मुळे हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने त्याच्या कुटुंबाची होणारी हाल अपेष्टा मुळे चिमुकल्या मुलांच्या मनात या सदर्भात ना प्रश्न घोंगावत असल्याने कल्याणच्या सिक्रेट हार्ट स्कूल मधील चिमुकल्या अन्नदाने शेतकऱ्याच्या शेतीला योग्य तो हमी भाव मिळवून देण्यासाठी चित्रपट ,मालिका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या सिने अभिनेता खा.अमोल कोल्हे यांच्या कडे शेतकऱ्याच्या शेती मालाला हमी भाव मिळवून देण्यासाठी संसदेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून द्यावा व शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात पुन्हा शेतकऱ्यासाठी सुराज्य आणावे या करिता साकडे घातले आहे.
शेतकऱ्याच्या शेती मालाला योग्य तो हमीभाव मिळवून देण्यासाठी संसदेत प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शंभर टक्के मदत करणार.भाजी विकत घेताना आपण भाजीचा भाव कमी करण्यासाठी धासाघिस करतो. मात्र मॉल मधील खरेदी केलेल्या वस्तूची किंमत कधी कमी करता तसा शेतकऱ्याच्या शेती मालासाठी मोलभाव करू नका असे ही आवाहनही खा.कोल्हे यांना केले.