डोंबिवली : टेम्पोच्या गाड्यांचे मोठ्या बॅटऱ्या चोरणाऱ्या दोघांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने अटक करून गजाजाड केले. हे चोरटे डोंबिवलीतील प्रीमियर कॉलनी मैदानाजवळ विकण्याकरता आले होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुहास उर्फ चिंग्या पाईकराव ( 21वर्षे र्षे रा.इंदिरानगर झोपडपट्टी शेलार नाका डोंबिवली पूर्व ) आणि रॉकी उर्फ मोनू चव्हाण ( 18 वर्षे रा. त्रिमूर्ती नगर झोपडपट्टी शेलार नाका ) असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. बुधवार 19 तारखेला रोजी कल्याण गुन्हे शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली होती की,सुहास उर्फ चिंग्या पाईकराव आणि रॉकी उर्फ मोनू चव्हाण यांनी टेम्पोच्या गाड्यांचे मोठ्या बॅटऱ्या चोरून विकण्यासाठी प्रीमियर कॉलनी मैदा येथे येणार आहेत. गुन्हे शाखा युनिट -3 कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांना कळविताच त्यांनी एक पथक सपोनि संदीप चव्हाण, सपोनिरी संतोष उगलमुगले, सहायक पो. उप.निरी.दत्ताराम भोसले,पोहवा बालाजी शिंदे,गुरुनाथ जरग,मिथुन राठोड,दिपक महाजन व चालक पोहवा बोरकर यांना बातमी मिळाल्या ठिकाणी तात्काळ रवाना करून सदर ठिकाणी वरील पथकाने सापळा रचला.
या ठिकाणी दोघे चोरटे रिक्षातून उतरले. दोघांकडे दोन गोण्या मध्ये काही तरी जड वस्तू असल्याचे दिसून आल्याने ते इकडे तिकडे कावरे बावरे पाहत असताना पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. तेच इसम असल्याची खात्री झाल्याने त्यांना पळून जाण्याचा मोका न देता घेराव करून 3:30 वाजता जागीच पकडले त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता सुहास उर्फ चिंग्या विजय पाईकराव आणि रॉकी उर्फ मोनू रमेश चव्हाण असे सांगितले. पोलिसांनी या दोघांकडील दोन्ही गोण्या उघडून पाहता अमरोन कंपनीच्या दोन बॅटऱ्या एक्साइड कंपनीच्या एक बॅटरी असे एकूण 3 मोठ्या बॅटऱ्या त्यांच्या ताब्यात मिळून आल्या.या बॅटऱ्या विक्री करण्याकरिता आलो असल्याची सांगितले.
पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता सदरच्या मोठ्या बॅटऱ्या या स्मशाल चौक शेलार नाका जवळ येथून दोन ॲपे टेम्पो व एक टाटा टेम्पोच्या बॅटऱ्या चोरल्याचे कबूल केले.या चोरीबाबत टिळक नगर पोलीस स्टेशनला खात्री केली असता टिळक नगर गुन्हा दाखल असून सदरचा गुन्हा उघडकीस आला. चोरीस गेलेल्या 3 बॅटऱ्यां एकूण 8000 रुपयांचा मुद्देमालासह ताब्यात घेऊन चोरट्यान व मुद्देमाल टिळक नगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.