पागोटे सरपंच कु. कुणाल पाटील यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन
उरण दि २० (विठ्ठल ममताबादे ) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे) रायगड जिल्हा प्रमुख तथा उरण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत पागोटे सरपंच कु. कुणाल अरुण पाटील व कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेच्या सौजन्याने गुरुवार दिनाकं २० जून २०२४ रोजी तु ह वाजेकर माध्यमिक विद्यालय, फुंडे येथील सर्व विद्यार्थ्यांना माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले, यावेळी फुंडे विद्यालयाचे चेअरमन कृष्णा कडू यांनी माजी आमदार मनोहरशेठ भोईर व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सदर कार्यक्रमास तु ह वाजेकर माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन कृष्णा कडू, पागोटे शिवसेना शाखेचे उपशाखाप्रमुख महेश पाटील, कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेचे सदस्य सुमित पाटील,नकुल पाटील,साईराज पाटील, ऋषिकेश म्हात्रे,विनय पाटील, प्रणय पाटील,निनाद पाटील,रोशन म्हात्रे,वृतिक पाटील,पंकज पाटील, प्रथम तांडेल,दर्शन म्हात्रे, दिनेश पाटील, सुरेंद्र पाटील, ऋषिकेश पाटील, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने होते.