डोंबिवली ( शंकर जाधव ) : वाको इंडिया चिल्ड्रन अँड क्रेडिट राष्ट्रीय किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२४ पुणे येथे किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र आणि वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशन यांच्या वतीने ठाणे शहर स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन - पालवा सिटीमध्ये राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामागिरी बजावली.
या स्पर्धेत अवनी कॅडिया ( सुवर्णं पदक ), अभा दरेकर, दुर्वेश तेवर , अभिवेद श्रीकुमार, पुष्यजा सरकार ( रोप्य पदक ), निवेद्या श्रीकुमार, रेवा सक्सेना, अवनीश समानता,शौर्या गोरे , श्रेयस झा ( कांस्य पदक) आणि वेदिका राय, आदी पिसोळकर, शाश्वत मोदि यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप पालवा सिटीप्राइड यंगवॉरियर, ठाणे शहर स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन अध्यक्ष डॉ. शुभम मिश्रा यांनी सर्व खिळाडूंना अभिनंदन केले.
ठाणे शहर स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशनचे 13 खेळाडू हे राष्ट्रीय पातळीवर खेळले.हे खेळाडू गेल्या दहा वर्षात खेळात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.