ठाणे, दिवा ता २१ जून ( संतोष पडवळ - प्रतिनिधी ) : दिवा शहरातील किरण ताटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते मानले जातात. अनेकजण पक्ष सोडून जात होत मात्र दिव्यातील किरण ताटे हा कार्यकर्ता शरद पवारांसोबत खंबिर पणे उभा राहिलेला पहावयास मिळाला. आज किरण ताटे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष्याच्या सेवादल महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयामधील बैठकीत
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. जानबा मस्के यांनी त्याना पत्र देऊन नियुक्ती केली.
प्रसंगी जयंत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले तर दिवा शहरामधून सौ. ज्योती निलेश पाटील (विधानसभा अध्यक्षा कल्याण ग्रामिण), श्री. लक्ष्मण पाटील (जिल्हा उपाध्यक्ष) राजेश भोंडवे , परशुराम पाटील , शिवाजी पाटील , सुनिल पाटील , पंढरीनाथ राऊळ यांच्यासह शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच अभिनंदन व कौतुक केले असून पुढील कार्यास अनेक शुभेच्छा दिल्या आहेत.