उरण दि २२ (विठ्ठल ममताबादे ) : सामाजिक कार्यकर्ते देविचंद अनंत म्हात्रे यांच्या संकल्पनेतुन एकविरा प्रेमी ग्रुप कोप्रोली उरण तर्फे दरवर्षी उरण ते कार्ला (एकविरा देवी मंदिर) असे बाईक रॅली काढली जाते व पर्यावरणाचा संरक्षणाचा संदेश देत दरवर्षी श्री एकविरा आई मंदिर कार्ला येथे डोंगर परिसरात वृक्षारोपण केले जाते.
उरण तालुक्यातील श्री एकविरा प्रेमी ग्रुप कोप्रोली उरण तर्फे यंदाही उरण ते श्री एकविरा मंदिर (कार्ला )अशी बाईक रॅली काढण्यात येणार आहे .कार्लाल्या पोहोचल्यावर एकविरा आईचे दर्शन घेतल्यानंतर सर्वांनी एकत्र येत एकविरा देवी मंदिर परीसरात वृक्षारोपण करणार आहेत.दरवर्षी अशा उपक्रमातून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश या उपक्रमाक्रतून देण्यात येतो.रविवार दि ७ जुलै २०२४ रोजी ही रॅली निघणार आहे.यावेळी मी एकविरा प्रेमी ग्रुप कोप्रोली उरणचे एकूण ३०० हुन जास्त पदाधिकारी सदस्य रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
ज्या भाविक भक्तांना, युवकांना या रॅलीत सहभागी व्हायचे आहे त्यांनी खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावे.
देविचंद म्हात्रे -9821838408,
विकी कोळी -9820673415,
विराज पाटील -9930207876,
विधाता पाटील -9920862029,
जितू पाटील -9773101513,
प्रसाद खोपटे -8855963776,
राहुल पाणदिवे -8424909645,
चेतन पिरकोन -9819759105