उरण दि ११ (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटना (शासन मान्यता प्राप्त) या संघटनेची कार्यकारणीची सर्वसाधारण सभा दिनांक ११ जून २०२४ रोजी मुंबई येथे पार पडली.
या बैठकीत सुरेश पोसतांडेल यांची राज्य प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा फेरनिवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी गिरीश डुबेवार , सरचिटणीस पदी अनिल पवार ,कोषाध्यक्ष लालू सोनकांबळे ,कार्यकारी अध्यक्ष रामेश्वर वाघमारे,प्रमुख मार्गदर्शक व कोर कमिटी सदस्य दीपक रोडे , विश्वनाथ घुगे, धर्मा खिल्लारे ,संघटक विजय भोंडवे व इतर पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.
या सर्व नियुक्त पदाधिकाऱ्यांवर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.उरण नगर परिषदेचे अधिकारी सुरेश पोसतांडेल हे मनमिळावू, अभ्यासू वृत्तीचे असून प्रशासकीय सेवेचा त्यांना प्रदीर्घ व उत्तम अनुभव आहे. संघटनेच्या माध्यमातून कामगार वर्गांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. विविध संघटनेच्या विभागवार बैठकीला त्यांची उपस्थिती असते. विविध कामगारांचे अनेक प्रश्न त्यांनी उत्तमरित्या हाताळले आहे. आपले काम चोखपणे बजावत, कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडून कामगार वर्गांना नेहमी न्याय दिला. कामगारांसोबत चांगले हीत संबंध जोपासून त्यांना जवळ करण्याचे व त्यांचे प्रश्न सोडविण्याचे चांगले संघटन कौशल्याही सुरेश पोसतांडेल यांच्यात असून त्याची चुणूक त्यांच्या कार्यातून नेहमी दिसते. अशा कामगारांच्या हितासाठी रात्रं दिवस झटणाऱ्या सुरेश पोसतांडेल यांची महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटना (शासन मान्यता प्राप्त )या संघटनेच्या राज्य प्रदेशाध्यक्ष पदी पुन्हा फेरनिवड करण्यात आली आहे.राज्य प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याने सुरेश पोसतांडेल यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून तर अनेकांनी व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरेश पोसतांडेल यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.
रायगड जिल्हाध्यक्ष सुनिल जाधव, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष नितीन कासारे, उरण शाखाध्यक्ष संतोष तेलंगे, शहर सरचिटणीस विजय पवार, शाखा उपाध्यक्ष हर्षद कांबळे, कोषाध्यक्ष संजय पवार, खजिनदार महेश जाधव आदी उरण नगर परिषदेच्या पदाधिकारी कर्मचाऱ्यांनी सुरेश पोसतांडेल यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.