डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका ॲक्शन मोडवर आली असून कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरात असलेल्या बेकायदा बारच्या विरोधात महापालिकेने कारवाई सुरु केली आहे. कल्याण पूर्वेतील सत्यम बार, कल्याण पश्चिमेतील वेंटेज, डोंबिवलीतील तीन ते चार बारसह ढाब्यावर जेसीबीच्या साह्याने कारवाई सुरू केली आहे.