Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

निसर्गप्रेमी सावित्रीने अनोखा संकल्प करतं केली वटपौर्णिमा साजरी !


उरण दि २२ (विठ्ठल ममताबादे ) : निसर्गाप्रती असणारी आस्था आणि प्रेम हे देखील एखाद्या संवेदनशील मनाचं मोठेपण दर्शवितं आणि तीच आस्था आणि प्रेम हे एखाद्या संपूर्ण परिवाराच्या हृदयात सामावलेलं असणं हा दुर्मिळ योगायोगच म्हणावा लागेल आणि ह्याच एक उत्तम उदाहरण पाहायला मिळालं ते आज पर्यावरण प्रेमी, वन्यजीवप्रेमी राजू मुंबईकर यांच्या सहचारिणी निसर्गप्रेमी सावित्रीची लेकं राजश्री ( राणीताई ) मुंबईकर यांच्या रूपानं.


हिंदु संस्कृतीत वर्षाऋतूतील जेष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस सर्व महिला भगिनीं वटपौर्णिमा म्हणून साजरा करतात ! ह्या दिवशी सर्व विवाहित महिलां आपल्या पतीला उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्य लाभावं या करिता वटवृक्षाची (वडाच्या झाडाची ) मनोभावे पूजाअर्चना करतात ! अध्यात्मिक दृष्टीने जेवढे महत्व ह्या सणाला आहे तितकेच महत्त्व वैज्ञानिक दृष्टीकोनातून सुध्दा या सणाला प्राप्त झाले आहे.ज्या सणांत झाडांची पूजा केली जातोय.अर्थातच त्या सणांला अनन्यसाधारण महत्व आहे.कारण एक वटवृक्ष दिवसाला शेकडो जणांना ऑक्सिजन देतो,निर्मलछाया देतो.आणि हेच पर्यावरणपूरक महत्व जाणून एक नवंसंकल्प मनाशी बाळगून अध्यात्माला वैज्ञानिक आधार देत राणीताई राजेंद्र मुंबईकर,रोहिणीताई पांडूरंग मुंबईकर,भारतीताई वैजनाथ मुंबईकर,सुजाताताई प्रविण कडू या आधुनिक युगातील सावित्रीच्या लेकिंनी आपल्या पतीराजांच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या मनोकामनेसाठी सोबतच साता जन्मांच्या सोबतीसाठी तब्बल २१ ( एकवीस ) वटवृक्षांची लागवड करण्याचा अनोखा नवंसंकल्प करत उरण येथील वेश्वी गावातील एकवीरा देवी मंदिराच्या पायथ्याशी राजू मुंबईकर यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या रॉक ॲनिमल पार्क येथे आजपर्यंत सलग चार वर्षे वटवृक्षांच्या झाडांची लागवड करून वटपौर्णिमा हा सण साजरा करत आहेत.ह्या अनोख्या अश्या पर्यावरणपूरक वटवृक्ष लागवड वटपौर्णिमा कार्यक्रमात निसर्गप्रेमी महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर,केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष स्नेहल पालकर,अनिल घरत आणि निसर्गप्रेमी बच्चे कंपनी उपस्थित होते .

सण - संस्कृती सोबतच विज्ञानाची कास धरणाऱ्या ह्या सवित्रिंच्या लेकींनी पर्यावरणाच्या संरक्षणा सोबतच ह्या मानवजातीला ऑक्सिजनरुपी नवंसंजीवनी देणाऱ्या ह्या शतायुषी महावृक्षांची लागवड करून समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे आणि म्हणूनच ह्या अनोख्या पद्धतीने निसर्गा सोबतच पर्यावरणपूरक धाग्याची विण वीनत नैसर्गिक ,धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून महत्त्व असणाऱ्या वटवृक्षांची लागवड करून वटपौर्णिमा साजरी करणाऱ्या निसर्गप्रेमी सवित्रिंच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक केलं जातं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Design by - Blogger Templates |