ठाणे / शिळफाटा ( विनोद वास्कर ) : शिळगांव मार्गावर व एकता नगर मधील पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनचे वॉल लिकेज, शिळ फाटा येथील एकता नगर आणि वल्लभ पाटील, यांच्या ऑफिस समोरील पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनीचे वॉल लिकेज झाल्यामुळे एका दिवसाला एका गावाला पाणी पुरेल एवढे पाणी हे वेस्टेज चालले आहे.
शिळ गावातील परिसरात आधीच नागरिकांना पाणी मिळत नाही आणि या दोन्ही ठिकाणी इतका लिकेज होत आहे की पूर्ण परिसरात पाणीच पाणी साठलाय. महापालिका अधिकारी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. नागरिकांना पाणी पुरवण्यासोबत पाण्याचा होणार अपव्यय थांबवणे ही देखील महापालिकेची जबाबदारी आहे. तरी संबंधित अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर सदर लिकेज बंद करावे. अशी मागणी रूपाली वास्कर यांनी केली आहे.
एकंदर महिलांना पाणी मिळत नसल्यामुळे पाण्यासाठी वणवण करावी लागते. वाॅल लिकिच असल्यामुळे दूषित पाणी पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनी मध्ये जाण्याची ही शक्यता आहे. त्यामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.