ठाणे दि. ०७, ( विनोद वास्कर ) : कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणूकीसाठी महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी आज बेलापूर कोकण भवन येथील निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
याप्रसंगी मंत्री आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, आमदार गणेश नाईक, आमदार किसन कथोरे, आमदार कुमार आयलानी यांच्यासह कल्याण जिल्हा सरचिटणीस, १४४ कल्याण जिल्हा निवणूक प्रमुख नंदकिशोर परब, अनुसूचित जाती जमाती सरचिटणीस शशीकांत कांबळे, कल्याण जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी तसेच महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.