कल्याणातील विविध शाळांना डावखरे यांनी दिली भेट
कल्याण दि.14 जून : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे हे सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे असून त्यांच्या विजयाची हॅटट्रिक नक्की असल्याचा विश्वास कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डावखरे यांनी कल्याण पश्चिमेतील विविध शाळांमध्ये भेट देत शिक्षकांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
येत्या 26 जून रोजी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार असून तत्पूर्वी उमेदवारांच्या गाठीभेटीनी जोर पकडला आहे. त्याचाच एक भाग म्हणून निरंजन डावखरे यांनी आपल्या प्रचारानिमित्त कल्याणातील वाणी विद्यालय, गुरूनानक विद्यालय, नूतन विद्यालय, ओक हायस्कूल, आचिव्हर्स स्कूल अँड कॉलेजमध्येही भेट दिली. आणि तिथल्या शिक्षक वर्ग आणि मुख्याध्यापकांची भेट घेत त्यांच्याशी डावखरे यांनी चर्चा केली. ज्यामध्ये ग्रीन स्कूल, डिजिटल स्कूल संकल्पना, स्पर्धा परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेसारख्या महत्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे.
तर निरंजन डावखरे यांनी गेल्या दोन्ही टर्ममध्ये अतिशय चांगले काम केले आहे. त्या जोरावर कोकण पदवीधर मतदारसंघातून ते नक्कीच विजयाची हॅटट्रिक करतील असा विश्वास माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार, भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील, कल्याण जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे, भाजप प्रदेश आघाडी सह संयोजक विकास पाटील, मा.नगरसेवक अर्जुन भोईर, कल्याण पश्चिम विधानसभा संयोजक अर्जून म्हात्रे, भाजपा कल्याण पुर्व शहराध्यक्ष संजय मोरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य एन.एम.भामरे, कल्याण डोंबिवली महानगर संयोजक सुभाष सरोदे, सचिव अनिरुद्ध चव्हाण, शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे कोकण विभागाध्यक्ष प्रशांत भामरे, देसले सर, अर्जुन उगलमुगले सर, चंद्रकांत ठाकूर, भास्कर नारखडे सर, बाळकृष्ण जगे सर, पत्रकार अरुण ठाणेकर, दिपक राजपूत, सुधाकर ठोके, प्रमोद चौधरी, गोकुळ गवळे, बाळकृष्ण जगे, सचिन निकम, अनिल ठाणकर, तेजनारायण सिंह, विरेंद्र तिवारी, नितिन मुंडे मान्यवर उपस्थित होते.