ठाणे, दि.21 - आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त नशाबंदी मंडळ महाराष्ट्राच्या वतीने डोंबिवलीतील नाना नानी पार्क, मानपाडा रोड या ठिकाणी व्यसनमुक्ती संकल्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमात रा.वी. नेरुरकर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक अनंत उतेकर यांच्यासह शंभरहून अधिक विद्यार्थी, शिक्षक व नागरिक उपस्थित होते. यावेळी योगा टीचर खुशबू मॅडम यांनी उपस्थित विद्यार्थी व महिला वर्गास योगाचे महत्व पटवून दिले. नशाबंदी मंडळाची माहिती व योगा दिनाचे महत्त्व अमोल स. भा. मडामे यांनी सांगितले. टिळकनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोतीराम बगाड यांनी व्यसन मुक्तीची शपथ दिली. भारती फाउंडेशनचे अध्यक्ष सूर्यकांत पारधे यांनी थॅलेसिमिया आजाराची माहिती, लक्षणे, उपाय सांगितले. कार्यक्रमांचे आयोजन नशाबंदी मंडळाचे ठाणे जिल्हा संघटक रविंद्र. क.शा. गुरचळ यांनी केले.