भाजपाचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी, तसंच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपाच्या गाभा समितीची बैठक झाली, त्या बैठकीनंतर ते बोलत होते. भाजपा, मित्र पक्षांसोबत महायुती म्हणून निवडणुका लढणार आहे. लवकरच मित्र पक्षांसोबत बैठक घेऊन सगळ्या २८८ जागांसाठीचा आराखडा निश्चित केला जाईल, असंही शेलार यांनी सांगितलं.
या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे यांच्यासह इतर मंत्री, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित हाेते.