Type Here to Get Search Results !

कल्याण गुन्हे शाखेच्या घटक-३ कडून सराईत मोटार सायकल चोर जेरबंद..


डोंबिवली ( प्रतिनिधी: अवधुत सावंत ) : आज दि. २२/०६/२०२४ रोजी गुन्हे शाखा घटक-३ कडील पोहवा. विश्वास माने व पो.कॉ. गुरूनाथ जरग यांनी टिळकनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. ५२४/२०२४ भादंवि कलम ३७९ प्रमाणे या गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देवुन परिसरातुन प्राप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्ह्यातील संशयीत इसमाचा गुप्त बातमीदारामार्फत शोध घेतला असता त्यांना बातमी मिळाली की, सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणारा सशंयीत इसम हा चोरीच्या ऍक्टीव्हा स्कुटीसह काटई बदलापुर रोड, काटई नाका, डोंबिवली पूर्व येथे येणार आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने पोलीस स्टाफसह जावून खात्री केली असता बातमीस अनुसरून इसम नामे गोपाळ रामदास अडसुळ (वय: ५० वर्षे) रा. अजय स्मृती अपार्टमेंट, रूम नं. १०६, पहिला माळा, पार्वती महादेव मदिंराजवळ, डोंबिवली (पुर्व) ऍक्टीव्हा स्कुटीसह सापडला.


त्याच्याकडे अधिक विचारपुस केली असता त्यांने टिळकनगर पोलीस ठाणे, डोंबिवली पोलीस ठाणे तसेच महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हददीतुन एकुण तीन होंडा कपंनीच्या ऍक्टीव्हा स्कुटी चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी गोपाळ रामदास अडसुळ याचे ताब्यातुन एकुण ५०,०००/- रुपये किंमतीच्या एकुण ०३ ऍक्टीव्हा स्कुटी जप्त करण्यात गुन्हे शाखा, घटक -३ कल्याण च्या पोलीसांना यश मिळाले आहे. सदर आरोपीस पुढील कारवाई करीता टिळकनगर पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आले आहे. सदर कारवाई दरम्यान खालीलप्रमाणे ०३ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
१. टिळकनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ५२४/२०२४ भादंवि कलम ३७९ प्रमाणे
२. डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ५७६/२०२४ भादंवि कलम ३७९ प्रमाणे
३. महात्मा फुले चौक पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ६६७/२०२१ भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हे शाखा, घटक -३,कल्याण च्या पोलीसांनी वरीलप्रमाणे ०३ गुन्हे उघडकीस आणले असून प्रस्तुत यशस्वी कामगिरी मा. पंजाबराव उगले,अपर पोलीस आयुक्त,(गुन्हे), मा. शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त,(गुन्हे) व मा. निलेश सोनावणे सहा पोलीस आयुक्त,(शोध-१) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, सपोनि. संदिप चव्हाण, सपोउनि. दत्ताराम भोसले, पोहवा. विश्वास माने, बालाजी शिंदे, विलास कडु, पोना. दिपक महाजन, पोकॉ. गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, विजेंद्र नवसारे, विनोद चन्ने, गोरक्ष शेकडे यांनी केलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies