डोंबिवली ( शंकर जाधव ) : गेल्या चार पाच वर्षांपासून डोंबिवली पश्चिमेला परिवहन बसेस धावत नसल्याने नागरिकांनी परिवहन व्यवस्थापणावर नाराजी व्यक्त केली आहे. काही वर्षांपूर्वी पश्चिमेला मोठा गाजावाजा करत राजकीत नेतेमंडळींच्या व परिवहन व्यवस्थापानातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बसेस सुरु झाले केल्या होत्या. मात्र काही दिवसांनी बसेस धावणे बंद झाल्या. भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक आणि माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांनी डोंबिवली पश्चिमेला नागरिकांच्या मागणीनुसार परिवहन बसेस सुरु करावी अशी मागणी केली आहे.
शिवसेनेचे भाऊसाहेब चौधरी हे परिवहन समितीचे सभापती असताना घाटकोपर स्टेशनबाहेरील परिवहन बस थांबा धर्तीवर डोंबिवली पश्चिमेला बस थांबा बनविला होता. आजही येथे हा बसथांबा असून त्याचे शेड नसल्याने फक्त फलक दिसते. एक - दीड वर्ष बसेस सुरु होत्या. डोंबिवलीकरांनी प्रशासनाचे आभार मानत उत्तम प्रतिसाद दिला.पश्चिमेला बसेस धावत असल्याने परिवहन व्यवस्थापणाच्या उत्पन्नात भर पडत होती.मात्र काही दिवसांनी येथील बसेस धावणे बंद करण्यात आल्या.
डोंबिवली स्टेशनबाहेरील परिसर फेरीवाला मुक्त करण्यास भाजपाचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक आणि माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांनी पाठपुरावा करून यश मिळवले. त्यामुळे स्टेशन बाहेरील परिसरात वाहतूक कोंडी होत नसल्याने परिवहन बसेस धावण्यास अडचण येत नव्हती.
डोंबिवली पश्चिमेला एका बसेसमध्ये 50 पेक्षा जास्त प्रवासी बसत असून बसभाडे पाच रुपये असते. त्यामुळे सकाळ व सायंकाळी नागरिकांना बसेसमधील प्रवास का खिशाला परवडणारा आहे. परिवहन व्यवस्थापणाच्या तिजोरात भर पडत असूनही पश्चिमेला बसेस का बंद केल्या यांचे उत्तर प्रशानाकडे नाही.