डोंबिवली ( शंकर जाधव ) : इंदिरा चौक या ठिकाणी कर्तव्य वाजवत असलेले पोलीस हवालदार भटु पाटील आणि वॉर्डन दिनकर सोमासे यांना एक गुड्स करियर वाहनावरील वाहन चालक शिळफाटा मार्गे डोंबिवलीत चुकून आत प्रवेश केला हे बघता डोंबिवली वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस हवालदार भटू पाटील यांनी त्याला थांबण्याची इशारा दिल्यानंतर त्याच्याजवळ गेल्यावर वाहन चालक शिवाजी चांदगुडे वय ४७ ते खूप आजारी हे असल्याचे समजले. पाटील यांनी तत्काळ आपल्या वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक गिरीश बने यांना सांगितल्यानंतर त्यांच्या आदेशांनी त्या वाहन चालकाला पाटील आणि दिनकर सोमासे यांनी शास्त्रीनगर रुग्णालत उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत रामनगर पोलिस स्टेशनला या बाबत सर्व माहीती देण्यात आली आहे .