ठाणे / दिवा दि.१५, ( विनोद वास्कर ) : सध्या दिवा शहरात अनेक बांधकामे चालू आहेत, बांधकामासाठी पिण्याचे पाण्याचे पाणी वापरलं जात असल्याचे आढळून आले आहे. दिव्यातील शहरातील नागरिकांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही पण दिव्यातील बांधकामाला पिण्याचे पाणी वापरण्यासाठी मिळतो. बांधकामाला पिण्याचे पाणी वापरले जात असल्याचे आढळून आल्याने दिवा प्रभाग समिती हद्दीतील खार्डीगाव भागातील नागरिकासह स्थानिक माजी नगरसेविका सुलोचना हिरा पाटील आक्रमक झाले आहेत. धरण क्षेत्रातील पाणी पातळी खालवल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महानगरपालिकांने नुकतीच १० टक्के पाणी कपात केली आहे. दिवा प्रभाग समिती भागातील खार्डी गावात येथील दुबे बिल्डर यांनी बेकायदेशीर रित्या पंप लावून बांधकामासाठी पाणी घेत असल्याचे निर्दशनास आणून दिले असल्याचे संबंधित विकासकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी ही केली आहे.
दिवा प्रभाग समितीच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरील असलेल्या सुदामा रेसिडेन्सी कॉम्प्लेक्स च्या मागे दुबे बिल्डर याचे कंट्रक्शन सुरू आहे. सदर ठिकाणी विकासाची दोन नल कलेक्शन असून त्या कलेक्शन मधून मोटर लावून पाणी खेचले जात असून सदर पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरले जात असल्याचा आरोप केल्यामुळे प्रकरणी माजी नगरसेविका सुलोचना हिरा पाटील यांनी दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदें यांना निवेदन द्वारे बिल्डरवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.