विश्व हिंदू परिषद बजरंग दल कळवा मुंब्रा जिल्हा कडून निषेध
ठाणे दि.१३, ( विनोद वास्कर ) : जम्मू काश्मीर मध्ये वैष्णोदेवी कटरा वरून काही भक्तगण /भाविक शिव खोडी ला जात असताना काही जिहादी पाकिस्तानी आतंकवाद्यांनी त्यांच्या बसवर अंदाधुंद गोळीबार करून १० भाविकांची हत्या केली.व जवळपास ३० ते ४० भाविकांना जखमी केले. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी संपूर्ण देशभरात विश्व हिंदू परिषद बजरंग दल मार्फत निषेध आंदोलन आयोजित केले होते.
त्यानुसार विश्व हिंदू परिषद बजरंग दल कळवा मुंब्रा जिल्हा च्या वतीने देखील डायघर नाका कल्याण फाटा येथे १२ जून २०२४ रोजी निषेध आंदोलन आयोजित केले होते.
सदर आंदोलनास विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री रविंद्र पाटील, मातृशक्ती प्रमुख संगीता पाटील, जिल्हा संयोजक गिरीश पाटील, धर्मजागरण प्रमुख रश्मी तिवारी, जिल्हा सेवा प्रमुख आशिष कनौजिया, धर्मप्रसार प्रमुख ओमप्रकाशजी, शीळ प्रखंड संयोजक प्रविण पावशे, साप्ताहिक मिलन प्रमुख संदेश साळुंखे, मुंब्रा प्रखंड मंत्री प्रथमेश जी, मुंब्रा प्रखंड संयोजक दिनेश जी, व कळवा मुंब्रा जिल्ह्यातील सर्व प्रखंडांचे कर्तकर्ते व सकल हिंदू समाज यांची उपस्थिती होती.