डोंबिवली ( शंकर जाधव ) : केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महापालिकेला २०७ ई बस मंजूर झाल्या होत्या. त्यापैकी नऊ ई बस या महापालिकेच्या डेपोत गेल्या सहा महिन्यांपासून वापराविना धुळखात पडलेल्या आहेत. डेपोच्या माध्यमातून महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या गाड्यांना डिझेल पुरवठा केला जातो. मात्र एका खाजगी रिक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी डिझेल पुरवठा केला जात असल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेत कारवाई करण्याची मागणी केली. शिवसेना ठाकरे गटाने ज्या डेपोतील धुळखात पडलेल्याई बसेसबाबत जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला.जर जनतेसाठी या ई बस वापरात आणत नसाल तरी बस भंगारात द्या, त्यासाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना वजन काटा भेट दिला.
धुळखात पडलेल्या ई बस भंगारात देण्यासाठी अधिकाऱ्यांना वजन काटा भेट
जून २७, २०२४
आठवडाभरात या ई बस रस्त्यावर धावल्या नाहीत, तर मात्र एका भंगारवाल्याला आणून या बस भंगार मध्ये देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ठाकरे गटाने सांगितलं. दुसरीकडे या ई बसचे रजिस्ट्रेशन रखडल्याने या बस रस्त्यावर धावू शकल्या नाहीत. मात्र आठवडाभरात हे सगळं काम पूर्ण करू असेआश्वासन अधिकाऱ्यांनी दिला.तसेच दुसरीकडे या ठिकाणी महापालिकेचा डिझेल डेपो आहे. या डेपोच्या माध्यमातून महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या गाड्यांना डिझेल पुरवठा केला जातो. मात्र एका खाजगी रिक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी डिझेल पुरवठा केला जात असल्याचा समोर आलं. ठाकरे गटाने या गोष्टीवर आक्षेप घेत कारवाई करण्याची मागणी केलीय. याबाबत अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला नोटीस पाठवून कारवाई करणार असल्याचे सांगितले.