लोणावळा : पावसाने राज्यात सर्वत्र हजेरी लावली आहे. सुट्टीचा निमित्त असल्यामुळे पर्यटक सहलीसाठी धबधब्यात हातात. पण अनेकदा तिथे अपघात घडतात. असाच अपघात लोणावळ्या जवळ भुशी डॅमच्या धबधब्यात घडला आहे. लोणावळ्यातील भुशी धरणाला अचानक आलेल्या पुरामुळे एकाच कुटुंबातील पाच जण पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेचा एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे.
सुट्टी निमित्त भुशी डॅम येथे गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले. पाण्याचा प्रवाह अचानक वाढला आणि पाहता पाहता हे पाच जण वाहून गेले. सदर घटना रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी तातडीनं स्थानिकांच्या मदतीने शोध आणि बचाव मोहीम सुरु केली. दोरी आणि ट्रेकिंग गियर सुसज्ज कर्मचाऱ्यांनी त्याच्या मृतदेहाचा शोध सुरु ठेवला. कुटुंबातील दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आज सकाळी उर्वरित तिघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले
रविवारी पुण्यातील लोणावळा परिसरातील भुशी धरणाच्या बॅकवॉटरजवळील एका धबधब्यात 4 आणि 9 वर्षांच्या मुलांसह एक महिला आणि दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.
हडपसर भागातील एक कुटुंब रविवारी सहलीसाठी तेथे आले होते ते भुशी डॅम जवळील धबधबा पाहण्यासाठी गेले असता अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि ते त्या प्रवाहात वाहून गेले या अपघात एक महिलेसह 4 मुलं वाहून गेली सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे