दिवा ( विनोद वास्कर ) : दिवा शहरातील साबे गावांमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ८० जवळ गटारावरील चेंबरचे झाकण गायब झाले आहे.
विद्यार्थी नागरिक तिथून ये-जा करतात त्यांचा अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच वाहन चालकाचे लक्ष नसले तर अपघात होण्याची शक्यता आहे.
प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन त्या ठिकाणी चेंबरचे झाकण हे लावण्यात यावे जेणेकरून अपघात होणार नाही. अशी मागणी उषा मुंडे, राणी वास्कर यांनी केली आहे.