उरण दि ३ (विठ्ठल ममताबादे ) : संपूर्ण उरण तालुक्यात अनधिकृत पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात उम्र रुप धारण केली आहे. अनधिकृत पार्किंग मूळे दरवर्षी उरण तालुक्यात अनेकांचे बळी जात आहेत. विविध अपघात व अनधिकृत पार्किंग मुळे आजपर्यंत ८०० हुन जास्त व्यक्तींचा मृत्यू उरण मध्ये झाला आहे.त्यामुळे या पार्श्वभूमीवर उरण परिसर व मुख्यत्वे करून शंकर मंदिर जासई,हायवे मार्गावर डिसीपी मा. तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीमती वैशाली गलांडे व ट्रॅफिक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अनधिकृतपणे असलेल्या वाहनांवर कारवाई केली. यावेळी कंटेनर , मालवाहतूक गाड्या, टेम्पो, ट्रक आदि वाहनांवर, वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाई मूळे उरण परिसर, जासई शंकर मंदिर,NH4B हायवे रोड आदि परिसर मोकळा झाला आहे. अनधिकृत पार्किंग करणारे वाहने हटविल्याने नागरिकांचा प्रवास सुलभ, आनंददायी झाला आहे.
- जानेवारी ते आजपर्यंत एकूण ७३८९ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.उरण परिसर,शंकर मंदिर जासई, NH4B या मार्गावर उभे असलेल्या अनधिकृत वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. चालक व मालकांनी आपली वाहने कोठेही पार्क करू नये.वाहतूकीच्या नियमांचे पालन करावे.येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना त्रास होईल असे वर्तन कोणीही करू नये.जो कोणी अनधिकृत पार्कीग करेल त्या वाहन चालक व मालकावर कारवाई करण्यात येईल.- श्रीमती वैशाली गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक.