Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

कावळा करतो काव काव, म्हणतो एक तरी झाड लाव, या घोषणांनी शिळगांव येथे कृषी दिन साजरा


ठाणे /शिळफाटा ( विनोद वास्कर ) : १ जूलै कृषी दिना निमित्त,शिळगांव येथिल स्व . हाशा रामा पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय तसेच ठाणे महापालिका शाळा क्रं ८१/ २६ च्या माध्यमातून झाडे लावण्याचा कार्यक्रम खरवली देवी मंदिर परिसरात करण्यात आले. 

त्या वेळी शाळेतिल शिक्षक वर्ग,व शिळगांव पोलिस पाटील संतोष भोईर, समाज सेवक सुनिल आलिमकर, बाबुराव मुंढे, मनसे विभाग अध्यक्ष व खरवली देवी ट्रस्ट सचिव शरद पाटील ग्रामस्थ उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

पर्यावरणाचे संतुलन टिकवायचे असेल तर २० टक्के असलेले वनक्षेत्र ३०% नेण्याची गरज आहे हे काम शालेय विद्यार्थीच करू शकतात. मात्र, या विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी समाजाने पुढे यायला हवे याकडे सामाजिक बांधिलकीतून पाहणे आवश्यक आहे. असे मत शिळ गावातील मनसे विभाग अध्यक्ष शरद पाटील यांनी व्यक्त केले. झाडे लावा झाडे जगवा, एक मूल एक झाड, कावळा करतो काव काव म्हणतो एक तरी झाड लाव अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. 

समाजसेवक बाबुराव मुंडे म्हणाले झाडे आपल्याला ऑक्सिजन देतो, फळ,फुल, सावली, झाडापासून अनेक प्रकारच्या लाकडी वस्तू आपण घरात वापरतो, तुम्हा सर्वांना अनुभव आलाच असेल आपणा एखाद्या कुटुंबातील सदस्य रुग्णालयात असतो तेव्हा प्रत्येक दिवसाला ३५ हजार रुपयांचे ऑक्सीजन लागत असतो. विचार करा एक झाड किती नागरिकांना ऑक्सिजन देतो, हवेतील वातावरणातील कार्बनडा ऑक्साईड खेचून आपल्याला ऑक्सिजन देतो, हवेतील कार्बनड ऑक्साईड खेचत असतो, आणि हवेत ऑक्सिजन सोडत असतो. त्यामुळे हवेतील वातावरणात ओझल वायू हा टिकून राहतो. झाडांची आपण जर कतल केली. झाडे जर नष्ट झाली तर आपल्याला ऑक्सिजन विकत घेऊन पाठीवर फिरावे लागेल. असे मत बाबुराव मुंडे यांनी व्यक्त केले. म्हणून वृक्षवल्ली ही आपली सोयरे असे म्हणतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Design by - Blogger Templates |