डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याणमधील बैलबजार परिसरात असलेले प्राण्याचे रुग्णालय स्थलांतरित करण्यात आले आहे.
मात्र याची माहिती नसल्याने आणि रुग्णालयाच्या नावाने असलेला दूरध्वनी क्रमांक देखील वारंवार बंद लागत असल्याने प्राणी मित्र मनोज वाघमारे याने आजारी बकरीला घेऊन थेट महापालिका मुख्यालयात नेले. मुख्यालयातील सुरक्षा रक्षकाला अडवत त्याला बकरी मुख्यालयात नेण्यास दिला. प्राणी मित्राच्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा शहरात सुरु झाली आहे.
याबाबत प्राणी मित्र वाघमारे म्हणाले, पूर्वी कल्याण मधील बैलबाजारात प्राण्याचे रुग्णालय होते. मात्र आता तेथे हे रुग्णालय नसल्याने नेमके कुठे स्थलांतर केले हे नागरिकांना समजने आवश्यक आहे. माझ्या मित्रांची बकरी आजारी असल्याने मी प्राणी रुग्णालय कुठे आहे याची माहिती घेण्यासाठी पालिकेच्या सुरक्षा रक्षक कार्यालयात व पालिका उपायुक्त यांना कॉल करतोय पण फक्त रिंग वाजतेय. कुणी माझा कॉलच उचलत नाही.