ठाणे / शिळफाटा दि. ३०, ( विनोद वास्कर ) : शिळगांवात बत्ती गुल, विद्युत वाहिनीची तार तुटली.
आज रात्री ९:३० वाजता पाऊस आणि वादळी वारा असल्याने विद्युत वाहिनीची मुख्य तार तुटून पडली त्यामुळे शिळ गावातील बत्ती गुल झाली आहे. अनेक तक्रारी करून सुद्धा महावितरण टोरंटो पॉवर कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी पाहणी करायला करण्यासाठी आले नाही. विद्युत वाहिनीची मुख्य तार तुटून पडली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
जर एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाला. तर याला जिम्मेदार महावितरण टोरंटो कंपनी कंपनी असणार आहे. अडीच तास होऊन सुद्धा महावितरण कंपनी दखल घेत नाही. महावितरण कंपनी एखाद्याचा मृत्यू होण्याची वाट बघत आहे का? आणखी किती बळी घेऊन कुटुंब उध्वस्त करणार असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.