डोंबिवली ( शंकर जाधव ) : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून डोंबिवली पूर्वेकडील आजदे गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना भाजपा पदाधिकाऱ्यांनी वह्या वाटपकरण्यात आले.
यावेळीभाजपा डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष मुकुंद ( विशू) पेडणेकर,महिला मोर्चा अध्यक्षा पूनम पाटील, महिला सरचिटणीस मनिषा छल्लारे, वर्षा परमार आदी उपस्थित होते.विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळणे आवश्यक असून सरकारकडून साहित्य मिळत असले तरी भाजपाच्या वतीने विद्यार्थ्याना शालेय साहित्य दिले जाते असे भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितले.