डोंबिवली ( शंकर जाधव ) : रविवारी रात्रभर कोसळलेल्या मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली करांचे हाल झाले. रेल्वे ट्रक पाण्याखाली गेल्याने काही वेळ रेल्वेसेवा ठप्प झालीहोती. पावसाने जरी भांडुप, कुर्ला रेल्वे मार्ग पाण्याखाली गेले तरी ठाण्यापलीकडील रेल्वे सकाळी काही प्रमाणात सुरू होती. मात्र धुवाधार पावसाने मुंबईतून येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्या अडकल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली. यामुळे सकाळी कामानिमित्त जाणाऱ्यांची कुचंबणा होऊन काही डोंबिवलीकर चाकरमानी रेल्वेत तर काही स्थानकात अडकून पडले. यामुळे पहिल्याच पावसाचा प्रवाशांना मोठा मनस्ताप झाला.
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामावर जाण्यासाठी रेल्वे स्थानकांत आल्यावर प्रवाशांना नक्की माहिती मिळाली नाही. त्यामुळेच रेल्वे गाड्या विलंबाने जात असूनही लोकांनी गर्दीतही त्या पकडून प्रवास केला. मात्र गाड्या पुढे जाऊन एक मागोमाग थांबल्यानंतर खरी परिस्थिती प्रवाश्यांच्या लक्षात आली. मात्र त्याचा काहीच उपयोग नसल्याने काहीही त्या गाडीतच थांबून तर काहींनी रेल्वेतून उतरून चालत आपल्या कामावर जाण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये त्यांची दमछाक झाली. रेल्वे धावत नाहीत हे समजून आल्यानंतर तसेच परत येणाऱ्या रेल्वे तुडुंब, खचाखच लोकांनी भरलेल्या दिसल्याने स्थानकात मुंबईला जाणाऱ्या लोकांनी अखेर पुन्हा घरीच जाणे पसंंत केले.
रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ६.१३ वाजता मुंबईला जाणारी बदलापूर लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी ९.४५ वाजता आली. तेव्हापासून स्थानकात प्रवाशांचा गोंधळ उडाला होता. अनियमित वेळेत लोकल धावत असल्याने या लोकल प्रवाशांनी तुडुंब भरून येत आहेत. त्यामुळे या लोकलने ठाणे, मुंबईपर्यंत प्रवास कसा करायचा या विचाराने प्रवासी महिला प्रवासी डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटावर येणाऱ्या लोकल सोडून देत होत्या नंतर येणारी कमी गर्दीच्या गाडीत शिरू असा करेपर्यंत वेळ निघून गेला. शेवटी वैतागून घरची वाट महिलांनी धरली असे रिक्षा चालक सांगत होते.
रेल्वे प्रवास नको म्हणून काही जण रोडमार्गे जाण्यावर ठाम होते पण तो हो मनसुबा पूर्ण झाला नाही. नवीन मानकोली उड्डाणपूल मार्ग व कल्याण शीळ या दोन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीमुळे गाड्या अडकून पडल्याने ठाणे व मुंबईत जाणाऱ्या लोकांची मोठी पंचायत झाली. त्यामुळे पुन्हा रेल्वे समांतर रस्त्याचे काय झाले अशी विचारणा डोंबिवलीकर करीत होते. पहिल्याच पावसात ही दशा झाल्याने लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.