डोंबिवली : पोलीस ठाण्याला हाकेच्या अंतरावर रस्त्यावर दारुड्यांची पार्टी' करत असल्याची दखल पोलीस आणि पालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई करत दारुड्यांना चोप दिला. तर पालिकेच्या पालिका घेतली. मंगळवार 2 जुलै रोजी सायंकाळी वाईन शॉप समोरील उघड्यावरील विक्री करत असलेल्या खाद्यपदार्थ कारवाई करत हटविले.
पालिका आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांच्या निर्देशानुसार डोंबिवली सहायक आयुक्त परिमंडळ - 2 हेमा मुंब्ररकर, 'ग'प्रभाग क्षेत्र सहायक आयुक्त संजय कुमावत, 'फ' प्रभाग क्षेत्र सहायक आयुक्त भरत पवार आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या आदेशानुसार डोंबिवली रामनगर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जावेदवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार 2 जुलै रोजी सायंकाळी पालिका कर्मचारी, पोलीस बंदोबस्ततात डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील शॉप समोर कारवाई करण्यात आली.
वाईण शॉपसमोरील कट्टावरबसून दारू पिणाऱ्या दारुड्यांना चोप देत हाकलावून देण्यात आले. तर पालिका प्रशासनाने फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. फेरीवाल्यांचे समान जप्त करण्यात आले. तर समोरील कट्टावर अनधिकृत बांधलेली टपरी तोडण्यात आली.
पालिका व पोलिसांची कारवाई सुरु असताना डोंबिवलीकरांनी पालिका व पोलिसांच्या कामाचे कौतुक केले. या कारवाईत सातत्य राहावे असे डोंबिवलीकर म्हणत होते.