मुंबई : विधानपरिषदेचा नावलौकीक उंचावणारी कामगिरी आज निवृत्त होणाऱ्या सदस्यांनी केली आहे. येणाऱ्या सदस्यांना या मंडळीचे काम अभ्यासता येईल, त्यातून प्रेरणा घेता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
विधान परिषदेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांना आज निरोप देण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. विधानपरिषदेतील विलास पोतनीस, निरंजन डावखरे, किशोर दराडे, कपिल पाटील, अॅड. अनिल परब, महादेव जानकर, डॉ. मनिषा कायंदे, विजय ऊर्फ भाई गिरकर, बाबाजानी दुर्राणी, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील, डॉ. मिर्झा वजाहत, डॉ. प्रज्ञा सातव, जयंत पाटील या सदस्यांना निरोप देण्यात आला.