मुंबई : टी-ट्वेंटी विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघातल्या मुंबईतल्या चार खेळाडूंनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि गणरायाची मुर्ती देऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबरोबर मनमोकळा संवादही साधला. या मुंबईकर क्रिकेटपटूंचा विधानभवनातही सत्कार होणार आहे.
या खेळाडूंचं विधानभवन परिसरात आगमन झालं असून, लेझीम आणि ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आलं.