जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी केले स्वागत.
उरण दि २५(विठ्ठल ममताबादे ) : विधानसभेच्या निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीमधे देशात व राज्यात कॉंग्रेस पक्षाने मुसंडी मारल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याने विविध पक्षातील महिला व युवक कार्यकर्ते कॉंग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत.
न्हावा गावातील शेकापक्षाच्या नेत्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून न्हावा महिला मंडळाच्या लढाऊ नेत्या श्रीमती. शांताबाई म्हात्रे श्रीमती. रमाबाई पाटील, निर्मलाताई ठाकूर यांनी आज कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेत्तृवाखाली कॉंग्रेस पक्षामधे प्रवेश केला.
यावेळी जेष्ठ कॉंग्रेस नेते किसन पाटील, न्हावा कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शैलेश म्हात्रे,राजेश म्हात्रे व इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. कॉंग्रेस पक्ष नेहमीच महिलांना व युवकांना पक्ष संघटनेत सन्मान देत असतो आपलाहि या पक्षामध्ये सन्मान राखला जाईल असे आश्वासन या प्रसंगी जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी दिले. व स्वगृही परत आल्या बद्दल त्यांचे मनापासून स्वागत केले.