कल्याण दि.4 जुलै : भाजपा कल्याण जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष आणि कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमलता पवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. एकीकडे मोफत आरोग्य शिबीर, वृक्षारोपण करण्यासह हेमलता पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला झाडाचं रोप वाटप करण्यात आले.
भाजपा महिला मोर्चा आणि कल्याण विकास फाऊंडेशनच्या माध्यमातून हेमलता नरेंद्र पवार यांनी कल्याण पश्चिमेमध्ये अनेकविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करत आपला वेगळा ठसा उमटविला आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून पवार यांनी मोठा जनसंपर्क जोडला असून वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
कल्याणच्या राजस्थान सभागृहात आयोजित वाढदिवसाच्या सोहळ्यात हेमलता नरेंद्र पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पवार कुटुंबीयांनी सामाजिक भान जपत आलेल्या प्रत्येक व्यक्तीला झाडाचे रोपटे भेट म्हणून देऊन आपल्या आईच्या प्रीत्यर्थ ते लावण्याचे आणि जगवण्याचे आवाहन केले. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपा जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे,मोहने टिटवाळा मंडल अध्यक्ष शक्तिवान भोईर, शिवाजी आव्हाड, प्रिया शर्मा, ज्योती भोईर, वैशाली पाटील, मेघा खेमा, स्वप्निल काठे, डॉ.पंकज उपाध्याय, रविंद्र घोडविंदे, सागर जोंधळे, विकास पाटील, सदा कोकणे, बाबा सिंह, विजय उपाध्याय आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते उपस्थितांना रोपांचे वाटप करण्यात आले.
तत्पूर्वी कल्याणच्या प्रभाग क्रमांक 7 आंबिवली गावठाणमध्ये भाजप, नरेंद्र पवार फाऊंडेशन, आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशन आणि नेरूळच्या तेरणा रिसर्च हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रक्ताच्या विविध तपासणी, रक्तदाब तपासणी, ईसीजी, हृदय चिकित्सा, अल्प दरात सिटीसॅक्न, एमआरआय, डोळे तपासणी, मोफत चष्मे वाटप, विविध आजारांबाबत तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, मोफत शस्त्रक्रिया उपचार आदींचा नागरिकांनी मोठा लाभ घेतला.
यावेळी भाजपा मोहने टिटवाळा मंडल उपाध्यक्ष नवनाथ पाटील, मंडल सरचिटणीस संतोष शिंगोळे, अनंता पाटील, जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस संदीप पाटील, मंडल युवा मोर्चा अध्यक्ष शशिकांत पाटील, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सारिका पाटील, महिला वॉर्ड अध्यक्ष जस्मिन पाटील, वॉर्ड अध्यक्ष दशरथ पाटील, राजन पाटील, कैलास पाटील, भरत कडाली, सुनील भालेकर, अक्षय पाटील, प्रतीक्षा बारलो आदी पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.