कल्याण ( शंकर जाधव ) : चार ते पाच जणांनी मिळून एकाची हत्या केल्याची घटना हत्या सोमवार 1 जुलै रोजी सायंकाळ च्या सुमारास कल्याणमधील 100 फुटी चौक रस्त्यावर घडली. संदीप राठोड असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. संदीप याची हत्या जुन्या वादातून हत्या झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील 100 फुटी चौक परिसरात सायंकाळी एका तरुणावर चार ते पाच तरुणांनी धारदार शस्त्राने सपासप वार करून प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. हा हल्ल्यात मरण पावलेला संदीप राठोड हा महालक्ष्मीनगर परिसरात राहत होता. हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. भर चौकात हत्या झाल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.