नवी दिल्ली : नवी दिल्लीत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली अंमली पदार्थ समन्वय केंद्राच्या सातव्या उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
मानस म्हणजेच मादक पदार्थ प्रतिबंध सूचना केंद्र या राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी हेल्पलाइनचा प्रारंभ गृहमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. त्याचप्रमाणे श्रीनगर इथल्या अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोच्या क्षेत्रीय कार्यालयाचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होत आहे.
देशातील अंमली पदार्थांची तस्करी आणि सेवन रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध संस्थांच्या प्रयत्नांमध्ये समन्वय साधणं हे या बैठकीचं उद्दिष्ट आहे.