कल्याण (संजय कांबळे) : दरवर्षी प्रमाणे आताही कल्याण मुरबाड या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या या परिसरातील लोकांना खड्डे, चिखल, अपघात आणि रस्त्यावर पाणी भरल्याने जनजीवन विस्कळीत आदी समस्या, अडचणी, यांना सामोरे जावे लागणार आहे, त्यामुळे वरील घटनांना सालाबादप्रमाणे म्हणण्याची वेळ येथील लोकांच्या वर आली आहे,
गेल्या३/४वर्षापासून म्हारळ, वरप, कांबा, यासह कल्याण मुरबाड महामार्गावर प्रवास करणाऱ्या लोकांना शहाड उड्डाणपूल ते पाचवामैल दरम्यान सुरू केलेल्या सिंमेट काँक्रीटीकरण रस्त्याच्या भोंगळ कारभारामुळे भयानक त्रास झाला, अनेकांचा जीव गेला, अपंगत्व आले, शेवटी हा रस्ता कसाबसा तयार झाला, त्यामुळे आता तरी या त्रासातून मुक्ती मिळेल असे वाटत असतानाच पुढे पाचवामैल ते मुरबाड असे रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली, संबंधित ठेकेदार व अधिकारी यांनी कोणतीही एक लाईन पुर्ण न करता पाचवामैल पासून ते घोरले पर्यंत रस्ता खोदून ठेवला, अनेक ठिकाणी मो-याचे काम सुरू केले, तेही अर्धवट, रस्ता अर्धवट, गटारे अर्धवट, डिवाईडर अर्धवट, खड्डी अर्धवट आणि अशातच पावसाने सुरुवात केली, त्यामुळे खड्डे, चिखल, त्यावरून तयार झालेली घसरगुंडी, यामुळे होणारे अपघात आणि ऐवढ्या संकटातून मार्ग काढून पुढे प्रवास केलाच तर म्हारळ सोसायटी, कांबा, टाटा पावर हाऊस, कांबा पेट्रोल पंप, पांजरापोळ, आदी ठिकाणी रस्त्यावरील पाणी आहेच वाट रोखायला?
त्यामुळे सालाबादप्रमाणे यंदाही म्हारळ, वरप, कांबा या गावासह कल्याण मुरबाड रस्त्यावर प्रवास करणाऱ्या, प्रवासी, चाकरमानी, शेतकरी, छोटे मोठे व्यापारी, आदींना त्रास होणारच, यात शंका नाही.
विशेष करून काही दिवसांपूर्वी आमदार किसन कथोरे यांनी कल्याण प्रांताधिकारी विश्वास गुजर,नँशनल हायवे चे अधिकारी ,व बांंधकाम विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ यांना घेऊन नुकसान भरपाई पाहणी दौरा केला, मात्र यामध्ये लोकांना होणारा त्रास, अथवा मोठ्या प्रमाणात तोडलेली झाडे, चिखल, खड्डे, भरावामुळे तुंबणारे पाणी?आदी महत्त्वाच्या विषयावर चकार शब्द काढला नाही, तसेच मागील काही वर्षापासून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही, यावेळी ही मिळेल अशी अजिबात शक्यता नाही, तर हा पाहणी दौऱ्याची उठाठेव कशासाठी असा प्रश्न या भागातील शेतकरी विचारत आहेत, त्यामुळे सध्याचे महत्त्वाचे प्रश्न सोडून इतर उठाठेव थांबवावी असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्ञानेश्वर पाटील यांनी व्यक्त केले.