डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवलीतील केरळीय समाजम रजी.संस्थेच्या वतीने डोंबिवलीतील शैक्षणिक संस्थे व्यतिरिक्त विविध उपक्रम व सामाजिक कार्य केले जाते. संस्थेच्या सामाजिक उपक्रमात खारीचा वाटा म्हणून संस्थेच्या यंदाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने डोंबिवली शहरासह आजु-बाजूच्या ठाणे शहरातील गोर गरीब व गरजू लोकांसाठी सामूहिक आंतर जातीय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष वर्गीस दानियर यांनी मंगळवार 23 तारखेला डोंबिवली पूर्वेकडील केरलीय समाज डोंबिवलीच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत देण्यात आली.
पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष वर्गिस दानियर, सचिव राज शेखरन, फायनस सचिव बिनोय थोमस, उपाध्यक्ष सोमामधु, आर्ट अँड कर्चरल सचिव सुरेश बाबू आदी उपस्थित होते.यावेळी माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष वर्गिस दानियर म्हणाले, या सामूहिक. विवाह सोहळ्यासाठी नावनोंदणी सुरु असून सप्टेंबर ते ऑक्टॉबर महिन्यात सोहळा पार पडतील. विवाहित जोडल्याला संसारासाठी आवश्यक सामुग्री देण्यात येईल.