Type Here to Get Search Results !

दिव्यात मारहाणीतून हत्या ; २४ तासात आरोपी अटकेत.



ठाणे, दिवा  : - दिवा-शीळ रोडवरील कार धुण्याच्या सर्विस स्टेशनमध्ये आलेल्या इसमास शुल्लक कारणावरून बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. सदर हत्या प्रकरणातील आरोपींना अवघ्या 24 तासात मुंब्रा पोलिसांना यश आले आहे. दिव्यातील टाटा पावर लाईन जवळ आदर्श स्कुल येथे एक इसम झाडी व गवताच्या मध्ये पडला असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली होती. सदर इसमास पुढील उपचारा करीता छत्रपती शिवाजी महाराज हॉस्टिपल कळवा येथे नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यु अशी नोंद करण्यात आली होती. मारहाणी मुळे तो मयत झाले असल्याचे समजल्यामुळे मयत तरुणाची ओळख पटवली असता तो शोविक गौर श्रीमनी, वय. ३५ वर्षे, कोलकता, पश्चिम बंगाल येथील असल्याचे समजले.

सदर घटनेचा अधिक तपास मुंब्रा पोलिसांनी केला असता मयत शोविक हा जवळील कार धुण्याचे सर्व्हिस स्टेशन दिवा शीळ रोड येथे आला असता त्यास आकाश भोईर, जितेश भोईर व इतर साथीदारांनी मयतास इथे कशासाठी आला येथुन निघुन जा असे बोलण्यावरून वाद झाला. या कारणावरून त्यांनी मयत यास लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर पहाटे ०५.०० वा. चे सुमारास सदर इसमास सुलतान मेहमुद शेख, वय २८ वर्षे आणि रितेश राजेंद्र प्रसाद राजभर वय २८ वर्षे यांचे ताब्यात दिले. त्या दोघांनी एका भाडोत्री ऑटो रिक्षाने बौध्द विहार जवळ दिवा येथे पुन्हा मारहाण केली व बाजुच्या झाडीमध्ये टाकुन दिले होते.

पोलिसांनी सुलतान मेहमुद शेख, वय २८ वर्षे रा. दिवा २) रितेश राजेंद्र प्रसाद राजभर वय २८ वर्षे रा.दिवा याना ताब्यात घेवुन अधिक चौकशी केली असता त्यांनीच मारहाण करून फेकुन दिले असल्याचे कबुल केल्याने मुंब्रा पोलीस ठाणे गु. रजि.नं. १६८०/२०२४, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), २३८, २१७, ३ (५) प्रमाणे दिनांक २६/७/२०२४ रोजी गुन्हा नोंद करून सदर गुन्हयात १) सुलतान मेहमुद शेख, वय २८ वर्षे २) रितेश राजेंद्र प्रसाद राजभर वय २८ वर्षे ३) आकाश शरद भोईर वय २८ वर्षे, रा. साबेगाव दिवा ४) जितेश भोईर यांना अटक करण्यात आली आहे.

नमुद गुन्हयाच्या तपासात मा. पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त श्री ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) श्री विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त श्री सुभाष बुरसे, सहा. पोलीस आयुक्त श्री उत्तम कोळेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अनिल शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री पाचोरकर, पोलीस निरीक्षक श्री संजय दवणे, सपोनि / कोळेकर, सपोनि / रोहीत केदार सपोनि / तांबे, सपोनि / तोरडमल व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी तपास केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies