डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण मधील कोळसे वाडी पोलीस ठाणे हद्दीत १०० फुटी रोडवरील हाजीमलंग रोडलगत सोमवार १ जुलै रोजी २६ वर्षीय संदीप नंदू राठोड यांची पाच इसमांनी धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घुण हत्या केली. या हत्येप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पाचजणांवर गुन्हा दाखल झाला. कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने २४ तासाच्या आत दोन मारेकऱ्यांना नाशिक येथील इगतपुरी येथून बेड्या ठोकून अटक केली. तर तिघे मारेकरी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शैफ उर्फ साहिल नसीर शेख ( २१ वर्षे, रा. स्वत:चे घर, मरीयम बी चाळ, जगदीश डेअरीच्या पाठीमागे, वालधुनी अशोकनगर, कल्याण पुर्व ) आणि विदयासागर तुलसीधरन मुर्तील उर्फ आण्णा (२१ वर्षे, रा. रूम नं. ०६, एकविरा अपार्टमेंट फिप्टी फिप्टी ढाब्याचे पाठीमागे, पिसवली गाव, हाजीमलंग रोड, कल्याण पुर्व ) असे अटक केलेल्या मारेकऱ्यांची नावे आहेत.
सोमवार १ जुलाई रोजी कल्याण मधील १०० फुटी चौकात संदिप राठोड या तरुणावर २६ वर्षेशैलू शेख आणि विद्यासागर आण्णा यांसह पाच जणांनीधारदार शस्त्राने डोक्यावर, खांदयावर, पाठीवर व पोटावर चॉपरने वार करूनजिवे ठार मारले.या हत्येप्रकरणी प्रेम विनोद चव्हाण यांच्या फिर्यादीवरून कोळशेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. ७६८/२०२४ बी एन एस २०२३ चे कलम १०३(१), १८९ (२), १९१ (२), १९१ (३), १९० मपोका कलम ३७ (१), (३), १३५ शस्त्र अधिनियम ४, २५ प्रमाणे पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या हत्येप्रकरणी पोलिसांनी तपास सुरुकेला असता घटनास्थळीवरील घटनास्थळीवरील सीसीटीव्ही फुटेज मिळाले.सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला.यातील दोघे मारेकरी हे नाशिक येथील इगतीपुरी रेल्वे स्टेशन येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पपोलिसांनी सापळा रचला.या ठिकाणी दोघे मारेकरी आले असता पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालून बेड्या ठोकल्या. पुर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून हत्या केली असल्याचे अटक आरोपींनी पोलिसांना सांगितले.
सदर कामगिरी पोलीस आयुक्त ( ठाणे शहर ) आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे ) पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त ( गुन्हे ) शिवराज पाटील, सहायक पोलीस आयुक्त, (शोध निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, सपोनि संदिप चव्हाण, सपोनि संतोष उगलमुगले, सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, पोहवा रमाकांत पाटील, अनुप कामत, प्रशांत वानखेडे, विलास कडु, गोरखनाथ पोटे, अमोल बोरकर, पोना दिपक महाजन, सचिन वानखेडे, पो.कॉ.मिथुन राठोड, पो.कॉ.गुरूनाथ जरग, रविंद्र लांडगे यांनी केली.