Type Here to Get Search Results !

वारकरी व महिला उद्योग भवनाच्या निर्मितीसाठी भरघोस विकासनिधी द्या ; साई पायी पालखी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या साईभक्तांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करा - माजी आमदार नरेंद्र पवार यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी


पवार यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

 कल्याण  : कल्याण डोंबिवली महानगर पालिकाक्षेत्रातील आरक्षित भूखंडावर वारकरी व महिला उद्योग भवनाच्या निर्मितीसाठी भरघोस विकासनिधी मिळावा आणि साई पायी पालखी सोहळ्यात झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या साईभक्तांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत विशेष आर्थिक मदत मिळण्याची मागणी कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पवार यांनी आज सह्याद्री अतिथी गृह, मुंबई येथे फडणवीस यांची भेट घेऊन या मागण्यांचे निवेदन दिले आहे.


महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक जडणघडणीत वारकरी परंपरेचा फार मोठा वाटा आहे. याच वारकरी परंपरेच्या प्रसार आणि संवर्धनासाठी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात भव्यदिव्य वारकरी भवन उभारण्याची मागणी कल्याण शहरातील गेली ३५ वर्षापासून सांप्रदायिक कार्य करणाऱ्या श्री. ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय वारकरी सेवाभावी ट्रस्ट, बेतूरकर पाडा रजि. यांनी महापालिका प्रशासनाकडे तब्बल १३ वर्ष पाठपुरावा करून केली होती. या त्यांच्या मागणीनुसार महपालिकेच्या सर्वसाधरण सभेच्या ठरावानुसार या ट्रस्टला प्रभाग क्रमांक ०२ गंधारे येथे माधव संकल्प इमारतीच्या बाजूला १२८४ चौ. मीटर भूखंड वारकरी भवन व महिला उद्योग भवनासाठी भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

दरम्यान या भवनाच्या निर्मितीसाठी शासनाकडून भरघोस विकासनिधी उपलब्ध करून देण्याची मागणी या वारकरी सेवाभावी ट्रस्टने स्थानिक सर्व लोकप्रतिनिधीकडे केली आहे. त्यांच्या मागणीनुसार कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील वारकरी भवन व महिला उद्योग भवनाच्या निर्मितीसाठी विशेष शासकीय विकासनिधी उपलब्ध करून देण्याची मागणी नरेंद्र पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

तसेच गेल्या २२ वर्षांपासून ठाणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र टिटवाळा विभागातील मांडा परिसरातून श्रीक्षेत्र शिर्डी येथे पायी पालखी सोहळ्याचे आयोजन साई सेवा मंडळाच्या माध्यमातून करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षीही साई पायी पालखी सोहळा १३ जुलै रोजी श्रीक्षेत्र टिटवाळा येथून श्रीक्षेत्र शिर्डीकडे प्रस्थान झाला. या पायी पालखी सोहळ्यात नरेंद्र पवार देखील सहभागी झालो होते. १६ जुलै रोजी भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने घोटी – सिन्नर रस्त्यावर पालखी सोहळ्यातील ६ भाविकांना जोरदार धडक दिली.

या धडकेत ४ दिवस पालखीत चालणारे साई भक्त भावेश पाटील, रविंद्र पाटील, साईराज भोईर या भाविकांचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेबाबत वाडी वऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीला अटक करून त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे श्रीक्षेत्र टिटवाळा विभागावर शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या मृतांच्या कुटुंबांना सत्वानाबरोबर आर्थिक मदतीची देखील गरज आहे. राज्याचे पालक या नात्याने साई पायी पालखी सोहळ्यात झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या साईभक्तांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत आर्थिक मदत करण्याची मागणी पवार यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies