दिवा ( विनोद वास्कर ) : संभाजी ब्रिगेड चे डोंबिवली शहर अध्यक्ष तथा माहिती अधिकार कार्यकर्ता गोवर्धन पाटील याला ठाणे पोलिसांच्या ठाणे खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे.
ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने बुधवारी दिवा येथील खार्डी गावाजवळ गोवर्धन पाटील याला ताब्यात घेतले असून त्यांच्या गाडीमध्ये १५ ते २० लाख मिळाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे
पत्रकार तसेच अनेक विकास कामाची सोशल मीडियावर बदनामीकारक माहिती टाकून खंडणी उकळत असल्याचा संशय पोलिसांना असल्याने ठाणे खंडणी विरोधी पथकाने गोवर्धन पाटील याला ताबात घेतले असून पुढील चौकशी सुरू असून लवकरच खुलासा मिळणार असल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे.