नवी दिल्ली : प्रकृती अस्वास्थ्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना काल संध्याकाळी नवी दिल्लीतल्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
अडवाणी यांची प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत असं रूग्णालयाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात, वृद्धत्वाशी संबंधित आरोग्य समस्यांमुळे अडवाणी यांना एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं; मात्र दुसऱ्या दिवशी त्यांना घरी सोडण्यात आलं होतं .