दिवा : काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ दिवा शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानी निदर्शने केलीय. शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध नोंदविलाय. भारत देश सुरक्षित हातात आहे असं वातावरण भाजप तयार करतेय, मात्र वास्तविकता म्हणजे देशात दहशतवादी हल्ले सुरू आहेत, भ्रष्टाचार - अत्याचार रोजच सुरु आहेत. असा आरोप करत शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिवा शहरात केंद्र सरकारचा निषेध केलाय.
दिवा शहरप्रमुख सचिन पाटील ह्याच्या नेतृ्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.
यावेळी विधानसभा संघटिका योगिता नाईक, शहर संघटिका ज्योती पाटील, उपशहर प्रमुख तेजस पोरजी, शहर समन्विका प्रियांका सावंत, उपशहर संघटिका स्मिता जाधव, विभाग प्रमुख चेतन पाटील, मच्छिंद्र लाड, शनिदास पाटील, मूर्ती मुंडे संजय जाधव, रवी रसाळ, विनया कदम, युवा सेनेचे सुयोग राणे उपस्थित होते