महापे /नवी मुंबई ( विनोद वास्कर ) : नवी मुंबईतील महापे गावातील शिवसेनेचे गटप्रमुख धोंडीराम नारायण साष्टे (५८ ) यांचे रविवारी सकाळी ६:४६ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पच्श्रात पत्नी तीन मुले आणि एक सून, तीन बहिणी असा परिवार आहे. आज सकाळी वाशी येथील मनपा रुग्णालयांमध्ये उपचार दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पार्थिवावर महापे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. धोंडीराम नारायण साष्टे यांच्या निधनामुळे निष्ठावंत, लढवय्या, कट्टर शिवसैनिक गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
धोंडूराम साष्टे यांची कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख होती. शिवसेनेच्या जुन्या फळीतील गट प्रमुख म्हणून त्यांची ओळख होती. बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वासू साथीदार म्हणून ते ओळखले जात होते. कायम त्यांच्या घरावर भगवा झेंडा हा फडकत असे आजही फडकतो. आपल्या पदाचा कधीही त्याने गैरवापर केला नाही. गोरगरिबाला न्याय देण्याचा सतत त्यांचा प्रयत्न असायचा. एकदा का कोणताही काम घेतला तर ते पूर्ण केल्याशिवाय गप्प राहत नसे. स्वभाव त्यांचा खूपच चांगला सर्वांशी प्रेमाने वागणारे सर्वांना आवो जावो म्हणणारे सर्वांची तब्येतीची विचारपूस करणारे. रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना आवाज देणारे. प्रत्येक समाजकार्यात उपस्थिती लावणारे आणि हातभार लावणारे, गावाच्या रस्त्याच्या विकासासाठी जागा सोडणारे एकमेव व्यक्ती, असा त्यांचा स्वभाव,सुरुवातीपासून कटर शिवसेनिक राहिले आणि मृत्यू नंतरही शिवसैनिकच राहिले. भगवा कलर हा त्यांचा आवडता रंग होता.