मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील, राज्यातल्या महायुती सरकारला, आज दोन वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त, महायुतीतील घटक पक्ष, केंद्र सरकारसह, जनतेचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, राज्याच्या विकासाचा ध्यास आणि सामान्यांचा विश्वास यांच्या बळावर महायुती सरकारनं दोन वर्षांची यशस्वी वाटचाल केली आहे,अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
या दोन वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं भक्कम पाठबळ लाभलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सर्व सहकाऱ्यांची समर्थ साथ लाभली, असंही ते म्हणाले.
राज्यातल्या जनतेनं दिलेलं प्रेम, शिवसैनिकांची साथ आणि महायुतीमधील पक्षांचा उत्तम समन्वया मुळे शेतकरी, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ आणि युवकांच्या लोकहिताची कामे मार्गी लागली असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आवर्जुन केला.