डोंबिवली ( शंकर जाधव ) : बुधवारपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका डोंबिवलीतील काही भागात व ग्रामीण भागाला पडला. काही भागात पावसाचे पाणी साचल्याची स्थिती दिसून आली. तर काही भागातील रस्त्यावर खड्डे पडले होते. डोंबिवलीजवळील ठाकुर्ली येथील स. वा. जोशी शाळेजवळ उड्डाणपुलापुढील नवापाडा येथे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. वाहनचालकांचा खड्ड्यामुळे अपघात होण्याची नाकारता येत नाही. गुरुवार 25 तारखेला पालिका प्रशासनाने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु झाले आहे.
पावसाळ्याच्या आधी पालिका प्रशासनाने रस्त्याचे काम पूर्ण करणे आवश्यक होते. रस्त्याचे डांबरीकरण काम सुरु असताना पालिकेच्या अभियंत्यांनी त्या जागी जाऊन पाहणी करणे आवश्यक असते. मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरु असताना पालिकेचे अधिकारी व अभियंता पाहणी करत नसल्याचे डोंबिवलीकरांचे म्हणणे आहे.